Devendra Fadanvis | बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी खेळी; पंकजा मुंडे यांना डावलून ‘या’ नेत्याशी सलगी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadanvis | शिवसेनेतून निलंबन झाल्यानंतर बीडचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करत त्यांनी याबाबतचे संकेत देखील दिले आहेत. तसेच नुकतचं गहिनीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात चांगलीच जवळीक बघायला मिळाली. त्यामुळेच भाजपचा बीड जिल्ह्याचा प्रमुख चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून जाणून बुजून जयदत्त क्षीरसागर यांना जवळ करण्यात येत आहे का? असा सवाल बीडच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

बीडमधील भाजपच्या प्रमुख नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सन्मान केला होता. त्यामुळे भविष्यात जयदत्त क्षीरसागर हे भाजपचा बीडचा चेहरा असतील अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच बीडमधील अजून एक ओबीसी नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू असून, जर येत्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर याबाबत कुणालाही नवल वाटू नये. अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा सोहळा महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान आहे. तसेच हा सोहळा राजकीय दृष्ट्या देखील तेवढाच महत्वाचा आहे. विशेष बाब म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने मुंडे भावंडं दरवर्षी एकत्र येत असतात. दरम्यान यंदाच्या सोहळ्यात त्यांचाच समावेश नसल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वर्षीच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहिले होते पण मुंडे भगिनींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

बीडमधील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते करण्यात आले. तसेच गहीनीनाथ गडावर उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करून जयदत्त क्षीरसागर हे
भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Web Title :- Devendra Fadanvis | devendra fadnavis gets closer to jaydutt kshirsagar after ditching pankaja munde