Devendra Fadanvis – BJP Vs Congress | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका, भाजपने खुलासा करताना लगावला टोला (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadanvis – BJP Vs Congress | नागपुरात शुक्रवारी मध्यरात्री चार तासांत तब्बल 109 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. शहरातील 10 हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी गेल्याने अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागपूरवर आस्मानी संकट असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत अमित शहांच्या दौऱ्यावर व्यस्त असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. (Devendra Fadanvis – BJP Vs Congress)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला व माहिती जाणून घेतली. यावेळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन काँग्रेसने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. तसेच या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Devendra Fadanvis – BJP Vs Congress)

देवेंद्र फडणवीस हे पाहणी करत असताना, अनेक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत होते. याचा एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमध्ये फडणवीस एका कार्यकर्त्याचा हात ओढून त्याला समोर आणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर (ट्विट) शेअर करत भाजपवर टीका केली. पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची आरेरावी. हीच काय आपल्या मतदारांसोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार? अशा शब्दात काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. यावर भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरुन खुलासा करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

चल बाबा तुझ्याही घरी येतो

काँग्रेसने ट्विटरवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यापुढे काय झाले, हे सांगणारा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा!, असे भाजपने म्हटले आहे. कार्यकर्त्याच्या घरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केल्याचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे.

जनतेने नाकारल्याने दुसरा कामधंदा नाही

पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…!, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

https://x.com/BJP4Maharashtra/status/1705909682227843544?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’

Sanjay Kakade | हा फक्त सत्कार; शाब्बासकी लोकसभा व विधानसभा जिंकल्यावर ! संजय काकडेंच्या वतीने
पुणे शहर भाजपा च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार