शरद पवारांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’, फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचे म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे. यामुळे कोरोनाच्या लढाईपासून दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
राज्यात ज्या दिशेने कोरोनाबाबत आपण जातोय ती परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील 46 टक्के मृतांचा आकडा आपल्या राज्यात आहे. अनेक मृत्यूंची नोंद केली नाही. 600 जणांचा मृत्यू अजूनही अपलोड केलेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर केला आहे.

‘नया है वह’ आदित्य ठाकरेंना टोला
‘नया है वह’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री यांना जे योग्य वाटतं ते त्यांना मंत्री करु शकतात. पण मंत्री बनल्याने शहाणपण येतच असं नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच अमिताभ बच्चन यांना लवकर आरोग्यलाभ व्हावा. त्यासोबतच ज्यांना कोरोना झाला झाला आहे, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like