नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय निश्चित

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचे आशिष देशमुख त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत असून मुख्यमंत्र्यांनी मोठी आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

या मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आशिष देशमुख यांना आतापर्यंत 34120 मते मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 61236 मते मिळाली आहेत. त्यामुळे फडणवीस यांचा विजय निश्चित समजला जात आहे. येथील 1850 मतदारांनी आतापर्यंत नोटा या पर्यायाचा वापर केला असून लवकरच निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

Visit : Policenama.com