राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस राम तर महाजन त्यांचे हनुमान  

नगर : पोलीसनामा ऑनलाईन – जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी विश्वासू समजली जाते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सोडवण्यासाठी दोघेही उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या दोघांना राम आणि हनुमानाची जोडी म्हणून संबोधले.

आयोजित ग्रामसभेचे निवेदन करताना निवेदकाने सरकारमधील हनुमान असलेले गिरिश महाजन, असा उल्लेख केला. तेव्हा प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. हनुमानाला आम्ही खूप त्रास दिला. एकदा तर ग्रामस्थांशी चर्चा न करताच त्यांना परतावे लागले, याबद्दल ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त केली. तुमचा हा हनुमान खूप चांगला आहे. अण्णांविषयी त्यांना खूप प्रेम आहे. त्यामुळेच त्यांना अण्णांचे उपोषण बघवेना, असं मुख्यमंत्र्यांना सांगत महाजनांचे कौतुक केले.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने महाजन यांनी विमानातून तिनदा उड्डाण केले. अखेर ते रामालाच म्हणडे देवेंद्र फडणवीस यांना घेवून आले, असंही म्हटलं गेलं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात फडणवीस राम आणि महाजन यांना हनुमान म्हटलं नाही तर नवीन वाटणार नाही.