काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याचा फडणवीसांना ‘खोचक’ सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीसांना राज्यातील सत्ता गमवावी लागली, त्यावेळेपासून देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीच्या सरकारला निशाणा बनवताना कायमच दिसले. परंतु आता काँग्रेसचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी फडणवीसांना योगगुरु रामदेव बाबांकडे जाऊन आत्मचिंतन करा असा सल्ला दिला. केदार म्हणाले की, फडणवीसांना पराभवाचं आत्मचिंत करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेवा बाबांकडे जायला हवे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी जोर लावला आहे. राज्यात सत्तास्थापनेत यश आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचा विश्वास वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील केदार यांनी भाजपवर निशाणा साधला. फडणवीस यांनी पाच वर्ष सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली हे आता कळेल. जनतेने आपल्याला का पराभूत केले याचे चिंतन त्यांनी करावे, यासाठी रामदेव बाबांकडे त्यांनी जावे असा खोचक सल्ला सुनील केदार यांनी फडणवीसांना दिला.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासंबंधित प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, बावनकुळेंना त्यांच्याच पक्षाने चिंतन करण्यास सांगितले. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असा चिमटा सुनील केदार यांनी बावनकुळेंना काढला.

नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेनला स्वतंत्र लढत आहे. जि. प. च्या निवडणूकीत महाविकासआघाडी दिसणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना सुनील केदार म्हणाले की, जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे इतर चर्चा नको.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/