काँग्रेससोबत जाऊ असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का ? फडणवीसांचा ‘सवाल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या नागपूरात विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. काँग्रेस सोबत जाऊ हा शब्द बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेने दिला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्या, 1990 नंतर भाजपला दोनवेळा 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, परंतु हे सरकार हाराकिरीचं सरकार आहे. यावेळी फडणवीस यांनी सामना वृत्तपत्रातील शरद पवारांबद्दलचा उल्लेख वाचून दाखवला.

फडणवीस म्हणाले की मी सामना वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले आहे. शरद पवारांबाबत काय काय बोलण्यात आलं, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलत आले? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असं फडणवीस म्हणताच सभागृहात गदारोळ झाला.

फडणवीस यांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेनेचे आमदार, मंत्रीही चांगलेच चिडले. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत. त्याचा सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे असे ही फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं की 25 हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि 50 हजार हेक्टरी बागायती शेतीला देऊ. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे आश्वासन देण्यात आलं होतं. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनाचं काय असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केला. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/