Devendra Fadnavis | ‘कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकचा पॅटर्न (Karnataka Pattern) महाराष्ट्रात चालणार नाही. देशात फक्त मोदी पॅटर्न (Modi Pattern) चालणार, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. तसेच पुढील सत्ता आपलीच असेल असाही दावा त्यांनी यावेळी केला. पुण्यात गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (National President J.P. Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), सीटी रवी (CT Ravi), विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), प्रवीण दरेकर (Praveen Darekar), नारायण राणे (Narayan Rane), गिरीश महाजन (Girish Mahajan), आशिष शेलार (Ashish Shelar), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शिल्लक सेना म्हणत ठाकरेंवर टीकास्त्र

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरादर हल्लाबोल केला. शिल्लक सेना म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे हे सरकार संविधानिक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील

कर्नाटक निकालावर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार (BJP Government) येणार आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराजयाची चर्चा होत आहे. मात्र, ज्यांची एक जागा निवडून आली नाही ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत. मात्र राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक पॅटर्न लागू करणार असं काहीजण सांगत आहेत. मात्र अल्पसंख्यांकाचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्र जिंकता येणार नाही, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न. भाजप आणि शिवसेनेची युती (BJP-Shiv Sena Alliance) भक्कम असून आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुढील वर्ष महत्त्वाचं

2023 चे शेवटचे सहा महिने आणि 2024 चे पहिले सहा महिने भाजपसाठी फार महत्वाचे आहेत. या दिवसात कोणतीही लालसा मनात न बाळगता भाजपसाठी द्यायचे आहेत. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वर्ष फार महत्त्वाचं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रिपद मागायचं नाही

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्यकर्त्यांकडे त्याग मागितला. मी विचारलं म्हणून सांगू नका, मनापासून तयारी आहे का? मग मी आज सांगतो, पुढच्या एक वर्षात कुणालाही काही मिळणार नाही. कुणी समिती, पद, मंत्रिपद मागायचं नाही. मंत्रिपद मागायचं नाही म्हटल्यावर सगळ्यांनी हो म्हटलं. पण एकही आमदार हो म्हणायला तयार नाही. आपण विस्तार करु, काळजी करु नका, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

तोच खरा भाजपचा कार्यकर्ता

फडणवीस पुढे म्हणाले, अतिशय गंभीरपणे मी म्हणू इच्छितो, आता ही वेळ आहे, पक्षाने मला काय दिलं? हे न विचारता मी पक्षाला काय देणार? हे सांगण्याची वेळ आहे. ज्याच्यामध्ये ही हिंमत आहे की, मी मागणार नाही देणार, ज्याच्यामध्ये ही दानत आहे की, मी मागणार नाही तर देणार, तोच खरा भाजपचा कार्य़कर्ता. जो केवळ घेण्याकरता या ठिकाणी आहे तो भाजपचा खरा कार्यकर्ता होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

त्यावेळी वाटत कशासरता राजकारणात आहोत?

अनेक हौशे-नौशे-गौशे असतात, सगळेच आपल्याला लागतात. पण समर्पण आपल्याला लागतं. मला आज आनंद होत आहे, आपल्याकडे जुने-नवे कार्यकर्ते आहेत. अनेक कार्यकर्ते जेव्हा समर्पणाने काम करताना दिसतात, ज्यांचा कदाचित पक्षाशी जास्त संबंध आला नसेल. तरी मला मनापासून आनंद होतो. पण कधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळालं नाही, मनासारखं झालं नाही म्हणून आक्रोश करताना दिसतो. त्यावेळी वाटतं की आपण कशाकरता या राजकारणात आलो आहोत? आपलं राजकारणाचं ध्येय काय आहे हा प्रश्न मला पडतो, असं फडणवीस म्हणाले.

तर मी घर सोडायला तयार

फडणवीस पुढे म्हणाले, मी आज तुम्हाला त्याग मागत आहे. मी तुम्हाला ऑफर देतो, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही पद सोडायला सांगा, पद सोडतो. तुम्ही सांगा घर सोडा, मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे. मी त्याग करायला तयार आहे, तुमची त्यागाची तयारी आहे का? ते सांगा. त्याग करण्याची तयारी असेल तर नुसते हात वर करु चालणार नाही. येत्या काळात तुमच्या कामाचे मुल्यमापन केले जाईल. वर्षभरानंतर खऱ्या अर्थाने त्याग केला आहे का, याचे मुल्यमापन केले जाईल. ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा काही उपयोग राहणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितले.

TRP साठी पवारांचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन टोला लगावा.
ते म्हणाले, मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार.
टीआरपी कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली.
शरद पवार म्हणाले 4-5 राज्यातच भाजपची सत्ता आहे. पण त्यांना माहिती नाही की देशातील 16 राज्यात
आमचं सरकार आहे. इतर ठिकाणी प्रमुख विरोधीपक्ष भाजप आहे.

पटोलेंना पुरस्कार दिला पाहिजे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी फडणवीसांवर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना फडणवीस यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. अंबानीच्या घरापुढचे स्फोटकं मी ठेवल्याचं नाना पटोले म्हणाले यासाठी त्यांना मोठा पुरस्कार दिला पाहिजे. आता मला इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट द्यावं की 26/11 बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला.

उद्धव ठाकरेंच्या माणसांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना परत पोलीस दलात (Mumbai Police) घेण्यासाठी
माझ्यावर दबाव टाकला होता. त्यावेळी मी नकार दिला. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर
वाझेंना पोलीस दलात दाखल करुन घतेल असल्याचा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला.

पवारांच्या पुस्तकातील 10 मुद्दे वाचून दाखवले

यावेळी शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकाचा दाखला देत
उद्धव ठाकरेंच्या पवारांनी दाखवून दिलेल्या मर्यादा फडणवीस यांनी वाचून दाखवल्या.

1. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंसोबत नव्हती.
2. उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तमबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.
3. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती.
4. कुठे काय घडतय, याच्याकडे त्यांचे बारीक लक्ष नव्हते.
5. उद्या काय होईल याचा अंदाज घेण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची,
याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.
6. त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.
7. महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.
8. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते मात्र ऑनलाईन पद्धतीने
9. दुसरीकडे राजेश टोपे, अजितदाद आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.
10. उद्धव ठाकरे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नाही.

Web Title :  Devendra Fadnavis | 26-11 bombings were done by nana patole devendra fadnavis response to that allegation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार?, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाची काय असणार रणनिती?; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले…

Malshej Ghat Closed | निसर्गरम्य माळशेज घाट आता दर गुरूवारी बंद, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल