Devendra Fadnavis | ‘आप’ दिल्लीपुरताच; हे पुन्हा एकदा सिद्ध झाले – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. या मतमोजणीत दुपारीच सर्व चित्र स्पष्ट झाले. भाजपने गुजरातमध्ये बाजी मारली आहे, तर हिमाचल प्रदेश पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आप आणि अरविंद केजरीवाल दिल्लीपुरतेच, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
फडणवीस म्हणाले, आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपच करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला गेला. आम्ही इकडून प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड आम्हाला दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या.
गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपला 184 पैकी 158 जागा मिळाल्या आहेत.
मागील विधानसभेत भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.
पण यावेळी भाजपने मोठी उसळी मारली आहे. काँग्रेसची मते आपने फोडली असे सर्वत्र म्हटले जात आहे,
परंतु आपनेदेखील पहिल्यांदाच मोठी बाजी मारली आहे. त्यांचे आमदार जरी निवडून आले नसले,
तरी त्यांचा एकूण मतांचा आकडा 12 टक्के आहे. काँग्रेस 27 टक्के मतांवर आहे, तर भाजपला बहुमत मिळाले आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | AAP is only in delhi gujarat results 2022 under leadership of narendra modi says bjp devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा
CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया