‘हे उध्दव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार’, फडणवीस यांचा आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – निव्वळ पोकळ घोषणाबाजी करायची अन् दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची (To mislead the public), असा आरोप करत हे उद्धव ठाकरे सरकार नव्हे, तर घूमजाव सरकार असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केला आहे. महाविकास आघाडीत कोणाचा पायपोस कुणाला नाही, एक मंत्री घोषणा करतो अन् दुसरा नकार देतो असे प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

कुठलीही मागणी केली नसताना ऊर्जामंत्री राऊत यांनी 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली. यावर त्यांच्याच सकारमधील इतर मंत्र्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. नंतर कोरोनाकाळातील वाढीव बिलात सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर 2 हजार कोटींपर्यंत माफी देण्याची घोषणा त्यांनी केली. आता महावितरणला नुकसान झाल्याचे सांगत सवलत देता येणार नाही, असे सांगितले जात आहे. या सरकारमध्ये कोणाचा पायपोस कुणाला नाही, असे ते म्हणाले. सरकारकडे रोजगार देण्याची कोणतीही ठोस योजना नाही. भाजपच्या काळात शिक्षकांना 20 टक्के अनुदान दिले जात होते. आघाडी सरकारने ते रोखले. विकासकामे रोखण्याची अनेक कामे महाविकास आघाडी सरकार करत आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे नव्हे, तर फक्त मुंबईचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत असल्याचे फडणवीस म्हणाले.

यावेळी महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, माजी आमदार सुधाकर देशमुख आदीसह भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.