Devendra Fadnavis | ‘आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत’, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काही माझे शत्रू नाहीत. वैचारिक मतभेद आमच्यात आहेत. उद्धवजींनी वेगळा विचार सोबत घेतला. माझ्या पक्षाचा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. त्यानुसार आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळात थोडं शत्रुत्व पाहायला मिळत आहे मात्र ते योग्य नसून हे कधीतरी आपल्याला संपवावं लागेल असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
LIVE | Media interaction in #Ahmednagar https://t.co/IRhCMZoUYY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2023
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, मी अनेकवेळा मुलाखतीमध्ये सांगितले आहे, उद्धवजी काय किंवा आदित्य ठाकरे काय माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण त्यांनी दुसरा विचार स्वीकारला. माझा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक (Ideological) विरोधक आहोत पण शत्रू नसल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले होते की, 2019 च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर सगळे पर्य़ाय खुले असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा दगा दिला होता, तर दुसरा दगा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला कारण पहाटेच्या शपथविधीची कल्पना त्यांना होती, असे फडणवीस म्हणाले होते. यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपले शत्रू नसल्याचे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊतांना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shivsena) फोडली असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
यावर विचारले असता फडणवीस हसून म्हणाले, संजय राऊत यांना माझी क्षमता इतकी वाटते आहे,
त्यांना इतका विश्वास वाटतो याबाद्दल आभार मानू. पण तुम्हाला एक सांगतो अलिकडच्या काळात संजय राऊत
जे बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दुर्दैवाने कसं आहे एका पक्षाचे ते नेते आहेत.
त्यांच्या लेव्हलच्या नेत्याने बोलताना थोडा विचार केला पाहिजे.
Web Title :- Devendra Fadnavis | aditya thackeray and uddhav thackeray are not my enemies said devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल