Devendra Fadnavis | ‘शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीचे अजूनही मनात शल्य आहे’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेला 2019 मध्ये मोदी-शहा यांच्या पाठिंब्याने घवघवीत यश मिळाले होते. आणि आता देखील त्यांच्याच पाठिंब्याने राज्यात सत्तांतर झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

भाजपने 2024 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने 2019 ला आमच्यासोबत बेईमानी केली. पण आता अमित शहा (Amit Shah) यांच्या पाठिंब्याने राज्यात सत्तांतर झाले आहे. अमित शहांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यातील बेईमानांचे सरकार गेले. अमित शहांच्या सुयोग्य नियोजनामुळे भाजपने निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरात महत्वाची भूमिका पार पाडल्याची सांगताच, फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis)

राज्यात 2019 च्या निवडणुकांनंतर राज्यात आतापर्यंत 3 सरकारे आली. सर्वप्रथम फडणवीस-पवार हे दीड
दिवसांचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आले. आणि शिवसेनेत बंड करुन मुख्यमंत्री शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात गेल्या चार महिन्यापासून तिसरे सरकार आले आहे. शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या मनात 2019 साली सरकार स्थापन न करता आल्याचे शल्य अजूनही मनात कायम आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते जाहीर सभेत बोलून दाखविले. 2014 साली शिवसेनेने केवळ 4 जागांसाठी युती तोडली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Web Title :- Devendra Fadnavis | alliance with shiv sena broke in just 4 seats devendra fadnavis still

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी