Devendra Fadnavis | अमृता फडणवीस राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) सोशल मीडियात सक्रीय असतात. त्या वेगवेगळ्या राजकीय मुद्यांवर रोखठोक भाष्य करत असतात. अमृता फडणवीसांनी शिवसेनेसोबत (Shivsena) ट्विटरवरुन घेतलेला पंगा चांगलाच चर्चेत आला होता. अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय विषयावर भाष्य करत असतात. त्यामुळे त्या भविष्यात राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, आता खुद्द पती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

नुकतेच अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ट्विटरवॉर सुरु झालं होतं. या घडामोडीवर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सध्या वैयक्तिक स्तरावर राजकारण सुरु आहे. राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला पाहिजे. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केले जात आहे. राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाहीत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, ड्रग्स पेडलर (Drugs peddler) असलेला जयदीप राणा (Jaideep Rana) हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आलं होतं. या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काम केले होते. तर हे गाणे अमृता फडणवीस आणि सोनू निगम (Sonu Nigam) यांनी गायले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पहात होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

 

Web Title :- Devendra Fadnavis | amrita fadnavis will never enter politics devendra fadnavis made it clear

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहोचल्या पानपट्टीवर अन्… (व्हिडीओ)

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ