Devendra Fadnavis And Ajit Pawar | अजित पवार-फडणवीसांची गुप्त भेट ? शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडापूर्वीच्या ’त्या’ रात्री काय घडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis And Ajit Pawar | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसह (Shivsena) राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा, विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीत भाजपाने (BJP) अगोदरच पराभव केल्याने त्यामधून पुरते सावरलेले नसतानाच शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Devendra Fadnavis And Ajit Pawar)

 

या राजकीय उलथा-पालथीनंतर सर्वांना आठवला तो देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा. पण त्यावेळी बंडाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झाली होती. विशेष म्हणजे आताही फडणवीस-अजितदादा या नेत्यांबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषदेत आमच्याकडेही असे बंड झाले होते अशी आठवण करून दिली आहे. या दरम्यान आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याची ही माहिती आहे. (Devendra Fadnavis And Ajit Pawar)

 

या सर्व राजकीय गदारोळात राज्याचे अजित पवार कुठे आहेत, अशी राजकीय कुजबुज सुरू होती. मात्र, अजित पवार हे नेहमी प्रमाणे मंत्रालयात बैठका घेत असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी अशीही माहिती समोर येत आहे की, राज्यात शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होण्यापूर्वी काही दिवस अगोदर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद निवडणुकीच्या काळात रात्री उशिरा गुप्त भेट झाल्याची माहिती आहे.
या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली ? हे अद्याप समजलेले नाही.
मात्र, अशी भेट झाल्याची माहिती जेव्हा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळाली त्यावेळी दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटे शिल्लक राहिलेले असताना अजित पवार, मंत्री जयंत पाटील (Jayant Patil),
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मतदानासाठी शेवटच्या क्षणी मतदान स्थळावर पोहोचले होते.

 

दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी गुजरातमधील सूरत निवडल्यानंतर या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत, याचे बर्‍यापैकी चित्र स्पष्ट झाले होते.
आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 आमदार गुवाहाटीमध्ये पोहचले आहेत.

 

2019 मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता.
त्यावेळी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह बंडखोरी करून भाजपासोबत गेले होते.
भाजपाने अजित पवार गटासोबत शपथग्रहण करून सत्तास्थापन केली होती. पण दीड दिवसांत ते सरकार पडले होते.
आता एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. शिंदे यांचे बंड किती यशस्वी होते ते येत्या काही तासांमध्येच समजणार आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis And Ajit Pawar | eknath shinde secret meeting between ajit pawar and devendra fadnavis what happened on that night before the shiv sena rebellion of eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा