OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला भाजपचा नेहमीच विरोध; एकनाथ खडसेंची भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama Online) –  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ओबीसींना मंडळ आयोगाने (OBC Board Commission) दिले होते. त्यावेळी भाजपने (BJP) त्याला विरोध केला. तेव्हापासून भाजपची भूमिका स्पष्ट आहे. व्हीपी सिंग यांचा पाठींबा काढला आणि सरकार कोसळले. तेही एका मुद्यावरच. देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्य सरकार काय करताय? ओबीसींना आरक्षण (OBC reservation) नाही मिळाले तर मी राजकीय सन्यास घेईल असे म्हणतात. मग पाच वर्षे सत्तेत असताना फडणवीसांनी काय केले? फडणवीसाचे नेतृत्त्व आल्यापासून ओबीसी नेत्यांवर अन्याय सत्र सुरु असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. devendra-fadnavis and bjp are responsible for the current situation regarding obc reservation says eknath khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केंद्र सरकार (Central Government) जन गणना करत असते. २०११ मध्येही ओबीसींची जातनिहाय गणना झाली. त्याचा डेटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हा डेटा मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
यापूर्वीही तशीच मागणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही केली होती.
मात्र केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असतानाही तुम्हाला डाटा मिळवता आला नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे.
हा खोटारडेपणाचा असून ओबीसी समाजाची (OBC society) दिशाभूल करण्याचा आहे असा आरोपही खडसेंनी केला.

राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
ओबीसींची जनगणना कशी करायची? त्यांना आरक्षण कस मिळवून द्यायचे यावर प्रयत्न सुरु असून आपणही त्यावर मार्ग सुचवणे अपेक्षित होते,
मात्र तुम्ही म्हणता, मला सत्ता द्या, मग मी तुम्हाला आरक्षण देतो, याचा अर्थ तुम्ही सत्तेसाठी किती हापापले आहेत, हेच या वरून दिसून येतं.
अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना खडसे म्हणाले, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मागास वर्गीय आयोगाची स्थापना केली आहे.
त्याच्यामाध्यमातून महाराष्ट्र सरकार ओबीसीची जनगणना करण्यासाठी सूचना करू शकणार आहे.
तसे प्रयत्नही सुरु केले आहेत. आकडेवारी येईल काम होईलहि पण इतकी वर्षे वाया गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्याचवेळी हा डेटा दिला असता तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात यावर निर्णय झाला असता.
आजची हि परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र फडणवीस यांची भूमिका हि ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे,
अशी युज अँड थ्रोची आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आपण सांगू शकतो.
त्यांच्या कार्यकाळात एकीकडे ओबीसींच्या पाठीशी असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांचे पाय खेचायचे, असा प्रकार पाहायला मिळाला आहे.
ओबीसींच्या आरक्षणाची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच (BJP) जबाबदार आल्याचा आरोप खडसे यांनी केला.

Advt.

ओबीसी आरक्षण संदर्भात संन्यास घेण्याची भाषा देवेंद्र फडणवीसयांनी नुकतीच केली आहे.
यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं.
ते म्हणाले, फडणवीस यांनी अनेकवेळा संन्यासाची भाषा केली आहे.
विदर्भ वेगळा होण्यासाठी आंदोलन सुरु होत त्यावेळीही त्यांनी विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. विदर्भ काही वेगळा झाला नाही आणि त्यांचे लग्न होऊन त्याना आता एक मुलगीही आहे,
तरी त्यांनी आपल आश्वासन पूर्ण केले नाही. त्यानंतरचा विचार केला तर राष्ट्रवादी (NCP) पक्षाशी युती कधीही करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनी सकाळी पाच वाजता युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
आणि आता ओबीसींच्या आरक्षणासाठी संन्यासाची भाषा बोलत आहे.
त्यांनी तत्व सोडली असून केवळ सत्ता मिळवणे हेच ध्येय आहे, असा आरोप त्यांनी केला.

भाजपमध्ये फडणवीसांचे नेतृत्त्व उदयास आल्यापासून ओबीसी नेत्यांवर अन्याय सुरु झाला आहे.
याचे उदाहरन द्यायचे झाले तर माझेच घ्या.
काहीही कारण नसताना माझ्या विरोधात अनेक चौकशा लावण्यात आल्या, ओबीसी नेत्यांना छळ करण्याचा हा प्रयत्न आहे,
कशासाठी बावनकुळे आणि आमच्या सारख्या नेत्यांची तिकिटे कापली.
ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारलं एवढाच नाही तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करण्यासाठी यांनीच प्रयत्न केले. माझ्या मुलीच्या पराभवसाठीही कोणी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे.
एकीकडे तिकीट द्यायचे आणि दुसरीकडे पराभवासाठी प्रयत्न करायचे.
मग कशासाठी तिकीट द्यायचे. त्यांच्यासाठो ओबीसी (OBC) हा केवळ वापर करण्यास साधन आल्याचंहि त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) आणि पालकमंत्री गुलाबरव पाटील (Guardian Minister Gulabrav Patil) यांच्यात केळी पीक विमा प्रश्नावर श्रेय घेण्यावरून कलगीतुरा रंगला आहे.
त्यावर आपण बोलणार नसल्याचं सांगितलं.

Web Title : devendra-fadnavis and bjp are responsible for the current situation regarding obc reservation says eknath khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर