अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा ; म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे शेवटचे अधिवेशन काल संपले. या विधानसभा कार्यकाळातील विधानसभा अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि वादांमुळे हे अधिवेशन चांगलेच चर्चेत राहिले. येत्या १ ते २ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे पहायला मिळत आहे.

या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेला देखील टोमणा मारला. काल शेवटच्या भाषणात त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणत आपण सत्तेत येणार असल्याचे संकेत दिले तर आमचं ठरलंय असे म्हणणाऱ्या शिवसेनेला देखील चिमटा काढला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना एक कविता म्हणून दाखवली. या कवितेतून त्यांनी विरोधकांना इशारा देण्याबरोबरच पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास देखील व्यक्त केला. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप आणि शिवसेनेत असलेल्या वादावरून देखील यामुळे त्यांनी टोमणा मारल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच असे दोन्हीही बाजूकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे भाषण फार महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईन ही कविता म्हणत मुख्यमंत्री कोण असेल याचे स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा देखील मांडला. शेती, पायाभूत सुविधा, उदयॊग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जलयुक्त शिवार योजनेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर भाषणात त्यांनी पुढे म्हटले की, विदर्भाचा विजेचा अनुशेष भरुन काढला. जलसिंचनाची कामं केली. विरोधकांनी सभागृहात सहकार्याची भावना ठेवली असे म्हणत त्यांनी विरोधकांचे कौतुक देखील केले.

दरम्यान, यावेळी त्यांनी सादर केलेली कविता खालीलप्रमाणे होती.

“शेवटी सांगतो – मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी.

मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी.

मी पुन्हा येईन, बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नवयुवकांना न्याय देण्यासाठी.

मी पुन्हा येईन, याच ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीची साथ घेईन, त्यांचा हात हातात घेईन.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे