Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांसमोरच देवेंद्र फडणवीसांची भर स्टेजवर काँग्रेसच्या मोठया नेत्याला ओपन ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | केंद्रीय नेतृत्वाच्या ना करतेपणाचा चांगला फटका काँग्रेसला (Congress Party) बसला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि आपापल्या रस्त्याला ते लागले. त्यात बऱ्याच जणांनी भाजपचा रस्ता पकडला हे जगजाहीर आहे. मात्र, यात दोष फक्त काँग्रेसच्या नेतृत्वाचा नसून भाजपनेही इतर पक्षातील अनेक नेते फोडून आपल्या पक्षात घेतले. भाजपचे (BJP) आजही प्रयत्न सुरू आहेत. पण, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावेळेस कहर केला. त्यांनी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यासमोर एका युवा नेत्याला फोडण्याचा प्रयत्न केला. (Devendra Fadnavis-Balasaheb Thorat)

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये सत्यजित तांबे यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांसमोर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना भाजपात येण्याची इच्छा बोलून दाखवली. (Devendra Fadnavis-Balasaheb Thorat)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजितसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? त्यांना जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा त्यांच्यावर जातो. कारण आम्हाला चांगली माणसं जमा करायची असतात.” देवेंद्र फडणवीस म्हणताच संपूर्ण सभागृहातील उपस्थितांना त्यांचे हसू आवरता आले नाही. त्यात स्वत: बाळासाहेब थोरात यांचाही समावेश होता.

देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट जरी चेष्टा म्हणून बोलली असली तरी काँग्रेसने याबाबत सावधगिरी बाळगणे
आवश्यक आहे. काँग्रेसची एकूण परिस्थिती पाहता, त्यांच्या पक्षातील अनेक प्रतिभावंत लोक अजून किती दिवस
या पक्षात थांबतील यात शंका उपस्थित होते.

Web Title :- Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | BJP Leader devendra fadnavis on satyajit tambe in fornt of congress leader balasaheb thorat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

World Weightlifting Championship | मनगटाच्या दुखापतीवर मात करत मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई