Devendra Fadnavis | 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं ?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | 2019 च्या निवडणुकीआधी (2019 Election) राष्ट्रवादी आणि भाजप (NCP-BJP Alliance) एकत्र येणार होते. याबाबत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीने शिवसेनेला (Shivsena) विरोध केल्याचं शेलार यांनी सांगितलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

 

2017 मध्ये काय घडलं होतं याबाबत विचारणा केली असता, जो बीत गई, वो बात गई, असं म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासदंर्भात बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. युतीबाबतच्या बातम्या कपोलकल्पित असून काही लोकांनी बातम्या सोडल्या असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

आमच्यामध्ये अजुन कोणतीही औपचारिक चर्चा झाली नाही. मात्र एक गोष्ट नक्की असून अलिकडच्या काळात त्यांनी घेतलेल्या भूमिका आमच्याही राहिल्या आहेत. मात्र आमची अजुन कोणतीही चर्चा झालेली नसून यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या अपरिपक्व असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करावं ठरलं मात्र आमचं शिवसेनेसोबत जमणारच नसल्याची राष्ट्रवादीने भूमिका घेतली.
मात्र त्यावेळी भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला होता.
मात्र 2019 मध्ये शिवसेनेने भाजपला सोडण्याची भूमिका सहजपणे घेतली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाची भूमिका किती महिन्यांमध्ये बदलते याचा साक्षीदार भाजप असल्याचं आशिष शेलार म्हणाले होते.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp devendra fadnavis on alliance with mns speaks on 2017 ncp offer

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा