
Devendra Fadnavis | ‘2024 मध्ये केंद्रात मोदी सरकारच येईल, विरोधकांमध्ये अंतर्गत सामना सुरूय’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) काल (बुधवारी) मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यानंतर आघाडी पक्षात आरोपांच्या फैरी झडत असल्याचं दिसलं. या भेटीनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘विरोधकांच्या अंतर्गत सामना सुरू असून, कितीही प्रयत्न झाले, तरी 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच (BJP) सरकार स्थापन करेल, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळीही सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. पण, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वास दाखवला. आताही 2024 मध्ये असेच होणार असून, पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, काँग्रेसशिवाय (Congress) आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून, विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरूय. त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल, हे पाहू असा टोला देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘काँग्रेसला (Congress) वगळून देशात
आघाडी निर्माण करण्याचा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा प्रयत्न आहे. त्याला शरद पवार यांची साथ आहे.
भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचे असे म्हणत असताना शरद पवार अंडर लाईन स्टेटमेंट करतात.
त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या असे म्हणायचे असते. तुम्ही एक लक्षात घ्या, ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत.
तर पवार साहेब बिटवीन द लाईन बोलणाऱ्या आहेत. दोघांचे बोलणे एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे. इतरांना सोबत घ्यायचे आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | bjp devendra fadnavis reaction mamata banerjee mumbai visit and sharad pawar meet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update