Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) मित्र पक्षाला हळूहळू संपवतो, असा हल्लाबोल शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवारांचं दु:ख वेगळं आहे. भाजप कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. आम्ही शिवसेनेला (Shivsena) मुख्यमंत्रीपद दिलंय असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह (Dhanushya Ban Symbol) आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असे म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढा असं सुनावलं. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे (Law of Defection) कुठे होते तेव्हा, कोणालाही कसेही बदलता येतात. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे, असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. एका वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

आमच्याकडे 115 आमदार आहेत, आमच्या मित्र पक्षाकडे 50 आमदार आहेत. तरीही आमच्यासोबतच्या पक्षाला मुख्यमंत्री केलं.
मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळं आहे. ते आपल्या सर्वांनाच माहितीय, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

 

खातेवाटपाआधी फडणवीसांची गुगली

मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारलं असता ते तर तुम्हीच करुन टाकलंय अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकले आहे.
आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही.
पुण तुम्ही जे खातेवाटप केलं ते सपशेल चुकीचं ठरेल एवढे मी नक्की सांगतो असं सांगत तुमचे अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा त्यांनी केला.

 

Web Title : –  Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा