Devendra Fadnavis | ‘ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण…’ देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि दहीहंडी (Dahi Handi) सणाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारची बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सव आणि दहीहंडी हे उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मेट्रो कारशेडसंदर्भातही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिका स्पष्ट करत आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) टोला लगावला.

 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड (Mumbai Metro Carshed) आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला असून, आरे वाचवा हे आंदोलन पुन्हा सुरु केले. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.

 

ठाकरे सरकारने इगोसाठी हा निर्णय बदलला

फडणवीस म्हणाले, पर्यावरणवादी उच्च न्यायालयात (High Court) गेले, त्यावेळी त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते एनजीटी (NGT) आणि सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथेही त्यांच्याविरोधात निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकालात लिहिलं आहे की, जी झाडं आपण कापली, ती त्यांच्या संपूर्ण जीवनात, लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन फिक्सेशन (Carbon Fixation) करतील, तेवढे ही मेट्रो 80 दिवसांत करेल. जवळपास 2 लाख मेट्रीक टन एवढं कार्बन उत्सर्जन आपण थांबवणार आहोत. ही मेट्रो थांबवणं म्हणजे मुंबईकरांचं आयुष्य कमी करण्यासारखं आहे. याशिवाय देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणीही नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पण ठाकरे सरकारने (Thackeray Government) केवळ इगोसाठी हा निर्णय बदलला होता, असेही फडणवीस म्हणाले.

 

ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण…

आरे येथे मेट्रोचं कारशेड झालं तर मिठी नदीला पूर येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण याचा अर्थ त्यांनीच सगळा अभ्यास केलाय, असा होत नाही.
या कारशेडसंदर्भात सगळा अभ्यास झालेला आहे. मिठी नदीला पूर मेट्रो कारशेडमुळे येईल असं नाही.
तर मुंबई महापालिकेनं दिलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम परवान्यामुळे होत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadanvis he may be the environment minister but he did not do all the studies fadanvis on aditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sonia Gandhi | ‘मी इंदिरा गांधींची सून आहे, कुणालाही…’, जुना व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

CM Eknath Shinde | ‘बंडखोर गद्दार’ शब्दावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्यांना काय…’

Gold Price Today | सोने आणि चांदीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी ताबडतोब जाणून घ्या नवीन दर