Devendra Fadnavis | फडणवीसांचे आमदार आणि कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘नाराज होऊ नका, आपलंच सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपने (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला पाठिंबा देऊन शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. तसेच आपण मंत्रिमंडळाबाहेर राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावला. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर भाजपचे आमदार (MLA), कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली. यावर फडणवीस यांनी आमदार, कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

 

काल शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचे नवीन सरकार कामाला लागले आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी आमदारांना हे सरकार आपलंच असून कोणी नाराज होऊ नका, असे आवाहन केले. तसेच त्यांनी 2024 निवडणुकीच्या (Election) तयारीला लागा असे निर्देशही दिले.

 

देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सरकार आपल्या हक्काचं आलं आहे.
कोणीही नाराज होऊ नका, खचून जाऊ नका असं आवाहन केलं. निधी वाटप व्यवस्थित होईल, पण जनतेत जाऊन काम करणं बंद करु नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. आपल्याला जनतेचं काम करायचं आहे, 2024 च्या तयारीला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली कामं मार्गी लावायची आहेत, त्यामुळे कोणी नाराज होऊ नका, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis meet bjp mla amide maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | अबब…शिंदे गटाच्या गुवाहाटीतील 8 दिवसाच्या फक्त जेवणाचं बिल तब्बल इतके लाख, एकूण खर्च किती?

 

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

 

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)