Devendra Fadanvis | ‘शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांचे मंत्री काय दिवे लावताहेत’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला एक नवंच वळण लागल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तसेच मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यानंतर फडणवीसांनी मलिकांचे आरोप फेटाळून लावत दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) यांचे मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी आर्थिक संबंध आहेत, असे फडणवीस यांनी कागदपत्रांचा दाखला देत म्हटले आहे. सरदार शहावली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोटात गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते या बॉम्बस्फोटात सहभागी होते. टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे कारस्थान शिजलं, त्या मिटींगला ते स्वत: उपस्थित होते. या बॉम्बस्फोटाची संपूर्ण माहितीही त्यांच्याकडे होती. ज्याठिकाणी आरडीएक्स भरलं त्याठिकाणीही ते होते. तर, महमद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशीही मलिक यांच्या कुटुंबीयांचे संबंध आहेत.

पुढे फडणवीस म्हणाले की, सलीम पटेल हे तेच आहेत, ज्यावेळी एका आर.आर.पाटील इफ्तार पार्टीला गेले होते, त्या पार्टीत असलेला दाऊदचा हस्तक म्हणजे सलीम पटेल. हसीन पारकरचा हा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आहे. हसीन आपा म्हणजे दाऊदची बहिण. हसीन आपाचा फ्रंटमॅन म्हणजे, ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी तयार व्हायची तोच हा सलीम पठाण, असे म्हणत या दोन्ही गुन्हेगारांचे संबंध नवाब मलिक यांच्याशी असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

Chitra Wagh | ‘उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय’

 

दरम्यान, कुर्ल्यातील एलबीएस रोडवर अतिशय महागडी जागा होती. सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्याकडे या जागेची मालकी होती. ती सॉलिडस कंपनीला ही जागा विकण्यात आली, त्यात फराज मलिक यांनी सही केली आहे. मलिक कुटुंबीयांनी ही जमीन विकत घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे, हे सर्व कागदपत्रे आणि पुरावे मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे देणार आहे. कारण, शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांच्या मंत्र्यांनी काय दिवे लावलेत, असा घणाघातही फडणवीसांनी मलिक यांच्यावर केला.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता.
या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे.
त्याचे फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते.
त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही काम केले होते.
तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते.
त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता.
असा आरोप मलिकांनी केला होता.

हे देखील वाचा

PV Sindhu ने ’Love Nwantinti’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, वायरल झाला Video

Rupay New Debit Card | प्री-टीनएजर्स आणि टीनएजर्ससाठी RuPay ने लाँच केले नवीन डेबिट कार्ड, जाणून घ्या कशा असतील सुविधा

RR Patil | ‘मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?’ आबांच्या कन्येची भावनिक पोस्ट व्हायरल

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | BJP Leader devendra fadanvis NCP Leader nawab maliks financial relationship accused 1993 bomb blast and dawood sharad Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update