Devendra Fadnavis | ‘मी देवेंद्र ‘शेट्टी’ फडणवीस, मला शेट्टी आडनाव लावयला आवडेल, त्यामुळे…’  बंट समाजाच्या कार्यक्रमात फडणवीस यांची फटकेबाजी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंट समाजाच्या (Bunt Samaj) कार्यक्रमात आतापर्यंत मी अनेकवेळा आलो आहे, त्यामुळे मला देवेंद्र शेट्टी फडणवीस म्हटलं जातंय, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. मला शेट्टी आडनाव (Shetty Surname) लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील, असंही ते गंमतीने म्हणाले अन् सभागृहात एकच हशा पिकला. कुर्ला येथे विश्व बंट संमेलनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, बंट समाज सर्वच आघाड्यांमध्ये पुढे असतो. हा समाज जिथे जाईल तिथे साखरेप्रमाणे मिसळतो. महाराष्ट्रात गोडवा वाढवला आहे. गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्यासारखे व्यक्ती राजकारणात देखील यशस्वी झाले आहेत. बंट समाजाचे अतिशय कमी मतदान असताना देखील गोपाळ शेट्टी हे मुंबईतून निवडून आले. समाजात जे लोक मागे आहेत त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत आहे. समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकार तुमच्यासोबत आहे. तुमची जेंव्हा प्रगती होते जेव्हा आपल्या राज्याची आणि देशाचीही प्रगती होते.

 

 

भाजप खासदार (BJP MP) गोपाळ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात दोन ठिकाणी दसरा मेळावा (Dussehra Melava) होतो ही चांगली गोष्ट आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर मी बोलणार नाही. वेदांत प्रकरणात (Vedanta Case) देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
त्यांचे भाषण सर्वांनी ऐकावे. वेदांता का गुजरातला गेलं हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.
हे भाषण ऐकून तरी विरोधकांचे डोकं ठिकाणावर आलं पाहिजे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis on shetty samaj community and hotel mumbai conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू

CM Eknath Shinde | ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण…’, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मागितली टाळी

Shivsena | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नवी कार्यकारिणी जाहीर