Devendra Fadnavis | राष्ट्रपती निवडणूक : ‘शरद पवारांचा तो व्यक्तीगत निर्णय, आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक (Presidential Election) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी काल विरोधकांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा व्यक्तीगत असून आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न घेणं हा शरद पवार यांचा व्यक्तिगत निर्णय असेल आणि तो त्यांनी विचारपूर्वक घेतला असेल. राष्ट्रपतीपदाकरता एनडीएजवळ (NDA) आणि त्यांना मदत करणारी एकूण मत जर पाहिली तर, एनडीए जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येणार आहे हे कोणत्याही राजकीय नेत्याला समजू शकतं. शरद पवार यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या प्रकृतीचं कारण सांगितलेलं असून आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे.

 

भाजप कडून ‘मिशन 48’ ची घोषणा
लोकसभा 2024 निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) ‘मिशन 48’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष दिले जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

48 मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न
पुढच्या 17 ते 18 महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.
केवळ निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आतापासूनच जनतेसोबत काम करायचं आहे.
राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadanvis reaction on ncp chief sharad pawar presidential election discussion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्‍याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

 

LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड

 

Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन