Devendra Fadnavis | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले – ‘ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन (Petrol Diesel Price) विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. परंतु, दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने इंधन दरात कपात करत नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर देशातील काही राज्यांनी पेट्रोल-डिझोलच्या दरात कपात केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) अद्याप दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार कधी निर्णय घेणार? असा प्रश्न राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे बोट दाखवले. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेमुळे एन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांचे फटके फुटताना पहायला मिळत आहेत.

 

काय म्हणाले शरद पवार

 

शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना जीएसटीच्या (GST) मुद्यावरुन केंद्र सरकारवर (Central Government) त्यांनी निशाणा साधला.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी त्यावर भाष्य केले.
राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे.
परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल, असे शरद पवार म्हणाले.

 

फडणवीसांनी साधला निशाणा

 

दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या विधानावर उलट निशाणा साधला.
मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे.
गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही.
पण केंद्राने 5 रुपये कर कमी केला की आपोआप 7 रुपये टॅक्स कमी (Tax reduction) होतो.
आमचं म्हणणय तो 10 ते 12 रुपये करा, असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis reply on ncp chief sharad pawar statement on gst

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे