Devendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) काही दिवसांपुर्वी किराणा दुकानामध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेतला होता. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान आज (गुरुवारी) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतून सरकारला टोला लगावला आहे. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ”छोटे का होईना, पण आज मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले. आज सरकारला राज्यातील नागरिकांचे काही देणे-घेणे नाही. नवीन योजना, प्रकल्पतर आणले नाहीत, उलट सुरू असलेली प्रकल्पही बंद पाडले. 2 वर्षात सरकारकडून काहीच होताना दिसत नाही,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ अशा शेलीत सरकारवर तोफ डागली.

 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”आमची चुक झाली, आधी आम्हाला वाटायचं की, ही महाविकास आघाडी आहे. पण, नंतर कळालं ही महाविनाश आघाडी, त्यानंतर कळालं ही महावसुली आघाडी आहे आणि आता कळतंय की, ही तर महामद्यविक्री आघाडी आहे. सरकारने दारू विक्रीसाठी अनेक निर्णय घेतले. चंद्रपुरची दारुबंदी मागे घेतली, अनेकांना दारुचे नवीन परवाने दिले. राज्याला मद्यराष्ट्र करणाचे काम सरकारकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.”

”ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या अनिल अवचट यांना सरकारने सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी वाईन विक्रीचा निर्णय घेतला.
आता आमच्या डोक्यात काही प्रश्न येतात, ड्राय डेला किराणा दुकाने सुरू राहणार का? त्यांचे एक नेते म्हणतात, वाईन दारू नाही.
मग आता ड्रंक अँड ड्राइव्हमधून वाईन बाहेर येणार का? यापुढे होणाऱ्या बैठकामध्येही चहा-पाण्याऐवजी वाईन सर्व्ह करणार का?
सरकार म्हणते, वाईनचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला.
पण, शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायचा होता, तर मग इतर अनेक गोष्टीचा निर्णय घेता आला असता,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते.
आम्ही उगाच मागील 22-25 वर्षांपासून सभागृहात लक्षवेधी आणि इतर माध्यमातून प्रश्न विचारत बसलोत.
तिकडे संसदेत आणि विधानसभेतही सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्याला संसदरत्न पुरस्कार मिळतो,
पण आज आम्हाला समजलं प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही,” असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis slams mahavikas aghadi over liquor sales in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | राज्य सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो केला ट्विट, राज्याच्या राजकारणात खळबळ

 

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी