Devendra Fadnavis | CM उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार, म्हणाले …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) याच्या सभेवरुन भाजप नेते (BJP Leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केली आहे. वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

 

शिवसैनिकांची वाट पाहिली, पण…
मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहे. बाबरी मशीद पाडायला (Babri Masjid) आम्ही कारसेवक गेलो होतो. मला बदायूच्या तुरुंगात (Badayu Prison) ठेवण्यात आलं होतं. तिथं मी शिवसैनिकांची वाट पहात होतो. पण कोणीच आलं नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जोरदार टोलेबाजी केली.

अहो उद्धवजी लाथ कोण मारतो?
आमचं हिंदुत्व गदाधारी आहे म्हणता. गध्यांना आम्ही अडीच वर्षापासून लाथ मारुन सोडलं सांगता.
अहो उद्धवजी, लाथा कोण मारतो, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) भोळे होते.
मी भोळा नाही, धूर्त आहे, फसणार नाही, असं काही दिवसांपूर्वी उद्धवजी म्हणाले. वाघ हा भोळाच असतो.
धूर्त कोण असतो हे सगळ्यांना माहित आहे. मलाही माहीत आहे. पण मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही,
असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP Leader devendra fadanvis statement on cm uddhav thackeray you cant become tiger by clicking their photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘कपडे काढायला लावा मला’, मास्क काढण्यास सांगणाऱ्याला अजित पवारांचा टोला

 

Mumbai High Court | वैद्यकीय तपासणीत ‘ती’ चा झाला ‘तो’, पोलीस खात्यात नोकरी देण्याचे कोर्टाचे आदेश

 

Anemia Problem | अ‍ॅनिमियाची समस्या असेल तेव्हा काय खावे आणि काय करावे, जाणून घ्या