Devendra Fadnavis | 2 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?, चौकशीनंतर फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…(व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बदल्यांबाबतचा (Transfer) अहवाल लीक झाल्याप्रकरणी आज (रविवार) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी (Inquiry) केली. चौकशीनंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोपनीय कायद्याचा (Confidentiality Act) भंग केला आहे आणि मीच आरोपी (Accused) आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच यापुढेही राज्य सरकारचे (Maharashtra Government) काळे कारनामे बाहेर काढणार असल्याचे म्हटले. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना (Union Home Secretary) दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी (CBI Inquiry) सुरु आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसतं असेही फडणवीस यांनी म्हटले.

यापूर्वी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी मला पोलिसांनी प्रश्नावली (Questionnaire) पाठवली होती. मात्र, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांसाठी मोठा फरक होता, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणात मला आरोपी अथवा सह आरोपी करता येईल का असा पोलिसांच्या प्रश्नाचा रोख होता. मी गोपनीय कायद्याचा भंग केला असा रोख पोलिसांचा होता. माझ्या आरोपानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्यावर व्हिसलबोअर कायदा (Whistleblower Act) लागू झाला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
मी सभागृहात सरकार विरोधातील मुद्दे मांडत असल्यामुळे मला अचानक नोटीस पाठवण्यात आली असावी. सरकारकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारच्या या दबावासमोर झुकणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंधित असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा (Resignation) आणि इतर मुद्यांवर कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

नवाब मलिकांवर कारवाई करा
पोलीस बदली घोटाळा प्रकरणी (Police Transfer Scam Case) मी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मात्र ट्रान्सक्रिप्ट (Transcript) आणि इतर माहिती पत्रकारांनी दिली नाही.
ही माहिती अतिशय संवेदनशील असल्याने ही माहिती दिली नाही. या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officers) नावाचा समावेश असल्याने केंद्रीय गृहसचिवांना ही माहिती, यादी दिली.
या उलट राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकारांना ही माहिती देत नावे उघड केली.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली.

 

Web Title :- Devendra fadnavis | BJP leader devendra fadnavis after mumbai cyber police record statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा