Devendra Fadnavis | ‘राजकारण गेलं चुलीत, मला महाराष्ट्राची जास्त चिंता कारण…’ – देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्याचं अधिवेशन पार पडलं असून यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) टाकत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik), वीज तोडणी या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र अशातच पुन्हा एकदा फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.

 

राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मला राजकारणापेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. कारण राज्यात सध्या ‘नो गव्हर्नन्स’ (No Governance) अशीच अवस्था पहायला मिळत आहे. अशी अवस्था राज्यानं कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठिक राहिला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे त्याला कुठेही बट्टा लागता कामा नये याची खरी काळजी घेण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

दरम्यान, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सभागृहात भाषण केलं.
या भाषणावेळी फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सामना पाहायला मिळाला.
मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या ठसकेदार भाषणातून विरोधकांवर निशाणा साधला होता.

 

Web Title :-Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis attacks maha vikas aghadi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा