Devendra Fadnavis | 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित ! महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कोण करतंय? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात (Maharashtra) अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार (Amravati violence) हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती असेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त (amravati riots) भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर (Raza Academy) बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली.

 

खोट्या माहितीच्या आधारे भांडवल केले
अमरावतीसह (amravati violence) राज्यातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले मोर्चे हे खोट्या माहितीच्या आधारे काढण्यात आले होते. त्रिपुरात (Tripura Violence) जी घटना घडली नाही, त्याचे खोट्या माहितीच्या आधारे भांडवल करण्यात आले. याच खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वनियोजनाशिवाय मोर्चे निघू शकत नाहीत. त्यामुळेच 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चांची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. सध्या सुरु असलेली कारवाई 13 नोव्हेंबरच्या घटनेवर आधारीत होत आहे. परंतु दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असा आरोप फडणवीस यांनी केला.


दंगल घडवायची होती

12 नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चा निघाला. या मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावती शहराची परिस्थिती बिघडली, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

 

फडणवीसांनी दिला इशारा
13 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर (BJP Activist) एकतर्फी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी (Maharashtra Police) मारहाणही केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली. खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर भाजप कार्यकर्ते जेलभरो आंदोलन (jail bharo agitation) करतील असा इशारा त्यांनी दिला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis attacks on Maharashtra government over amravati riots and Amravati violence demand of ban on Raza Academy marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Former MLA Mohan Joshi | ‘खासदार बापट यांची आदळआपट कशासाठी? मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी’

Mahadev Jankar | ‘आमचं सरकार होत तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेनं आता हुशार व्हावं’, महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

Ratnagiri District Bank Election | रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा झटका, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सरशी