Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले – ‘मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतले या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये (Taj President Hotel) बैठक झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी बाबत मोठे विधान केले.

 

महाविकास आघाडीचा पत्याचा बंगला हा राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) हलला होता. पण आता येत्या 20 तारखेला तो थेट कोसळेल, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सर्व आमदारांचे (BJP MLA) अभिनंदन केले. त्याचप्रमाणे राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे 10 तारखेला महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आता 20 तारखेला आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळेल.

 

भाजप विधानपरीषदेच्या आमदारांच्या बैठकीत काही आमदार गैरहजर होते. ते आमदार अद्याप मुंबईत दाखल झालेले नाही. त्यांना लवकरात लवकर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस रविवारी (दि.19) सर्व आमदारांना दुपारी चार वाजता मार्गदर्शन करणार आहेत.

भाजप 5 जागा लढवणार
BJP भाजप या निवडणुकीत पाच जागा लढवणार आहे. यामध्ये भाजप प्रवीण दरेकर (Praveen Darekar), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. तर शिवसेनेने (Shivsena) सचिन अहिर (Sachin Ahir), आमश्या पाडवी (Aamshya Padvi) यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) तर काँग्रेसकडून (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

 

कोणाकडे किती मतं?
या निवडणूकीत मतांचा कोटा पाहिला तर सत्ताधारी महाविकास आघाडी कडे 169 मते आहेत.
पक्षनिहाय काँग्रेस (Congress) पक्षाकडे 44 मते असून त्यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत.
विजयासाठी 27 मतांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आणखी 10 मतांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादीकडे (NCP) 54 मते तर उरलेली शिवसेनेकडे (Shivsena) मते आहेत.
तसेच निवडणूकीत भाजपने 5 उमेदवार दिले आहेत आणि भाजपकडे 113 मते आहेत.
त्यामुळे भाजपला (BJP) देखील अपक्ष आमदारांवर अवलंबून राहवे लागेल.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis big statement on maha vikas agahadi and mlc election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचा भाव किती ?

 

Pune PMC News | समाज मंदिर आणि व्यायामशाळेच्या ‘त्या’ निर्णयासाठी राज्य शासनाचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दणका

 

Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार