Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ; फडणवीस यांनी साधला निशाणा

औसा : पोलीसनामा ऑनलाइन – कोण संजय राऊत (Sanjay Raut), कोण आहेत ते. उलट सुटल बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, या देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत की त्यांना मुंबई पलीकडे काही दिसत नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

 

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार (BJP MLA Abhimanyu Pawar) यांच्या औसा विधानसभा मतदारसंघात (Ausa Assembly Constituency) शेतरस्त्याच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा (Union Minister Bhagwant Khubba) हे देखील उपस्थित होते. अभिमन्यु पवार यांनी एक हजार किलोमीटर शेतरस्ता, 300 किलोमीटर पक्का रस्ता, एक हजार शेततळे निर्मिती, एक हजार सिंचन विहिरी, एक हजार नाफेड कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, एक हजार वर्मीकंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, एक हजार जीवामृत निर्मिती प्रकल्प निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.

 

 

सत्तेत असला काय किंवा नसला काय फरक पडत नाही

शेतरस्त्याची कामे उत्तम झाली आहेत. शेतरस्ता हा महत्वाचा भाग आहे. हा औसा पॅटर्न तयार झाला आहे. हा 1000 किलोमीटरचा शेत रस्ता आहे. आमदार सत्तेत असला काय किंवा नसला काय यामुळं फरक पडत नाही. काम करण्याची इच्छा असली पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. सत्ताधाऱ्यांना असली कामं करता येत नाहीत, त्यासाठी कष्टच लागतात असे फडणवीस म्हणाले.

 

मोदी सरकारने अनुदान दिले

जागतिक बँकेचे खूप पैसे आले आहेत. या सरकारला ते वापरता येत नाहीत असेही फडणवीस म्हणाले.
जलयुक्त शिवारच्या कामामुळं पाणी साठवलं. त्यामुळे मोदी सरकारने उसाचा शेतकरी वाचवला असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्यात तर अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. दूध दर, सोयाबीन याचे भाव पडू लागले
त्यावेळी मोदी सरकारनं (Modi Government) अनुदान दिले असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader -devendra fadnavis criticism on shivsena leader sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा