Devendra Fadnavis | संजय राऊतांचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणार्‍यांना…’

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर, वैश्यांना आलेल्या पैशातही डल्ला मारल्याचा आरोप केला आहे. गडचिरोली (Gadchiroli) येथे भाजपने (BJP) आयोजित केलेल्या महाजनआक्रोश मोर्चावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे.

 

कोरोना (Corona) काळामध्ये केंद्र सरकारने सांगितलं दुर्दैवाने वैश्या व्यवसाय (Prostitution Business) करणाऱ्या भगिनींना मदत करा. तेव्हा वाटलं हे सरकार कोणत्यातरी एका घटकाला मदत करत आहेत मात्र हे नालायक निघालं. एका कोणत्या तरी संस्थेने पैसे दिले होते परंतु वैश्यांना द्यायचे पैसे त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिले असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

वैश्यांच्या पैशातही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वापरतात आणि तो तुम्हालाही माहित आहे तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर टीका केली. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रशेखर बावनकुळे (Sudhir Mungantiwar), खासदार अशोक नेते आणि इ. नेते उपस्थित होते.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत अन्न देण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी हजारो टन धान्य महाराष्ट्रात आलं.
मात्र अनेक गोडाऊनमध्ये ते सडलं कारण मोदींचं नाव होईल म्हणून ते धान्य गरिबांपर्यंत पोहोचवलं नसल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis criticize thackeray government mentioning sanjay raut over fund for prostitute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Beed Crime | दुर्देवी ! सेल्फीचा मोह बेतला जीवावर; नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

 

Pune Crime | धक्कादायक ! पिंपरीत DTDC कुरिअरने मागवल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान

 

Girish Bapat On Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर (Fast Track) सुरू करा – खासदार गिरीश बापट