Devendra Fadnavis | नाना पटोलेंविरोधात फडणवीस आक्रमक; म्हणाले – ‘राणेंना अटक करणारे पोलिस गप्प का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे चांगलंच वादंग निर्माण झालं आहे. ”मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो” असं विधान नाना पटोले यांनी केलं होतं. यानंतर आता भाजप (BJP) जोरदार आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पटोलेंच्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार टीका केली आहे. ”केंद्रीय मंत्र्यांना रातोरात अटक करणारे पोलिस कुठे आहेत?” असा जोरदार सवाल फडणवीसांनी केला आहे.

 

एका वृत्त वाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धीक उंची वाढते असं नाही. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोदींविरोधात किती राग आहे, हे दिसतंय. जे नाना पटोले बोलले ते काँग्रेसचे विचार आहेत. हे लोकशाहीला घातक आहेत. पटोलेंनी केलेलं वक्तव्य म्हणजेच गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यापेक्षा ते नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्य भयंकर आहे. केंद्रीय मंत्र्यांना रातोरात अटक करणारे पोलिस आता गप्प बसले आहेत. ते का कारवाई करत नाही ? निवडक काम सुरू आहे. पोलिस ज्या राज्यात निवडक होतात त्या राज्याची अधोगती होते.”

पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला रात्रीतून अटक करण्यात आली. नाना पटोले पंतप्रधानांना थेट धमकी देतात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला नाही. या राज्यात माणूस पाहून कायदा चालतो अशी परिस्थिती आहे. पटोलेंनी वक्तव्य केलं त्या गावात एकही मोदी नावाचा माणूस नाही. ते घाबरले आहेत. ते ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यांनी मोदींविरोधात वक्तव्य केलं. देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. हे त्यांचं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis demand action against nana patole over modi statement controversy

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा