Devendra Fadnavis | ‘…ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो’ – देवेंद्र फडणवीस

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | कालच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) खातेवाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाचे 9 आणि भाजपाचे 9 असे सध्या 18 कॅबिनेट मंत्री असून त्यापैकी कुणाला कोणते खाते मिळणार याची चर्चा आहे. खाते वाटप कधी होणार याबाबत आज पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता त्यांनी अतिशय सूचक विधान केले आहे.

 

एका उद्घाटन कार्यक्रमात फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिश्किलपणे म्हटले की, माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकले आहे. आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेले नाही. पण तुम्ही जे खातेवाटप केले आहे ते सपशेल चुकीचे ठरेल एवढे मी नक्की सांगतो. फडणवीसांच्या या वक्तव्याने अनेकांना धक्का बसला आहे. खातेवाटपात शिंदे-फडणवीस सरकार धक्कातंत्राचा वापर करणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

बिहारमध्ये झालेल्या राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिहारमध्ये भाजपाचे 75 आमदार निवडून आले. जदयूचे 42 लोक निवडून आले तरीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजपा कधीच मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणूनच आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली.

 

Web Title : –  Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis gives hint about cabinet department allocation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा