Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे”, राज्य सरकारच्या कर कपातीच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील इंधन दराचा भडका आणि महागाईचा चढता आलेख या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनंतर (Central Government) आता राज्य सरकारने (Maharashtra State Government) देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात (Petrol-Diesel Rates Reduced) कपात केली. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. हा निर्णय म्हणजे सामान्य माणसाची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी किमान 10 टक्के भार घेण्याची मागणी केली आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या (Maharashtra) आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) आपला वाटा 15 टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान 10 टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे!’

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली आहे. अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 रुपये आणि 2 रुपये दर कमी करणे, हे सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis harshly criticizes thackeray government after reduction of petrol and diesel price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’