वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) 16 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) पुढील दोन ते तीन दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबबात विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगळं कायदेशीर केल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करून टाकले. सरकारही तयार करुन टाकले. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगंळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते.
LIVE | Media interaction in #Wardha https://t.co/3SaJb6nyd4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 10, 2023
…तर गुन्हे दाखल करा
दरम्यान, कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर विरोधकांकडून हे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोर्टाच्या (Maharashtra Politics News) निकालापूर्वी जे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
राजकीय घडामोडींना वेग
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 15 तारखेपूर्वी सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) हे आज दुपारी अचानकपणे राजभवनात (Raj Bhavan) दाखल झाले. आदित्य ठाकरे राजभवनात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis important statement about political crisis of maharashtra and supreme court verdict
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update