Devendra Fadnavis | ‘कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?’, महाविकास आघाडीची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा (Police Officer Transfer Scam Case) अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी (Inquiry) सुरु आहे. चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलीस पथक (BKC Cyber Police) फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप (BJP) आज राज्यभर आंदोलन (Agitation) करणार आहे. यावरुन महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) मंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे ? ईडी (ED), आयकर विभाग (Income Tax Department), केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

 

मग हा तमाशा का ?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चौकशीवरुन सुरु असलेल्या गदारोळावरती शिवसेना नेते (Shiv Sena Leader) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत ट्विट करत म्हणाले, कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत ? महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले… लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का ?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे.
विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर (ND Patel Road Nashik) भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी केली.
तसेच नोटीसीच्या प्रतिमेची होळी केली.
तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये भाजप आमदार रवींद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis inquiry bjp protest sanjay raut chhagan bhujbal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा