Devendra Fadnavis | ‘भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या 5 जून रोजीच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी आधी माफी मागाावी असं तेथील मंहतही म्हणाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

”भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये,” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. ”रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, भगवान रामचंद्रांच्या चरणी येणाऱ्या कुण्याही व्यक्तीचा विरोध केला जाऊ नये. उत्तर प्रदेशमधील खासदार राज ठाकरेंचा विरोध का करत आहेत याबाबत कल्पना नाही. मी बृजभूषण यांच्याशी चर्चा करणार नाही,” असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय.

दरम्यान, ”राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये.
राज्य सरकार विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे,
राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटलं नव्हतं.
ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार,
आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis on raj thackeray brijbhushan singh ayodhya tour issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा