Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांची काल मुंबईत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप (BJP) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंच्या टीकेला आणि आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामा (Resignation) का दिला नाही. त्यावेळी निवडणुका (Elections) का घेतल्या नाहीत? असा थेट सवाल फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कालचं भाषण म्हणजे, निराशेचं होतं, माझा त्यांना सवाल आहे की, आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यावेळी राजीनामा का दिला नाही. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत. तुम्ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो वापरुन निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे द्यायचे होते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवायचं होतं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.

मला संपवण्याचा प्रयत्न केला पण…

मला असं वाटतं, त्यांचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. ते असंही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल, पण ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’, तुम्ही 2019 ला माझा शेवट होणार असं म्हणून प्रयत्न केला. तिघांनाही मिळून मला संपवण्यासाठी अडीच वर्ष प्रयत्न केले, पण कुणीही मला संपवू शकलं नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली.

https://fb.watch/fHSwaCZNG4/

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis on shivsena chief uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

Hardik Pandya | हार्दिक पांड्यामुळे बिहारच्या ‘या’ तरुणाचे बदलले नशीब, रातोरात बनला कोट्याधीश