Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदाच भाजप कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) उपस्थित होते. यावेळी राज्यातील सत्तांतराबाबत चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री (CM) करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी म्हणाले. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दु:ख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत.

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
कुठल्याही सरकारचे एकच मुख्यंमत्री असतात. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे आहेत.
ते मी याकरता सांगतोय, मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी एवढंच सांगितलं, आपल्याला हे माहिती नव्हतं. आपल्याला वाटलं आपलंच सरकार येणार आहे.
आपल्याला आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार आहे.
अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपलं वेगळं मत आहे,
असं अजिबात नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता हे चालत असतं.
माध्यमांचं काम असतं. ते त्यांचे काम करत असतात. आता शिवसेना (Shivsena) आणि भाजपचं सरकार (BJP Government) आहे.
हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच त्यासोबत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra-fadnavis reaction on chandrakant patil speech over eknath shinde cm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dr. Neelam Gorhe | जनतेच्या मनामधील सिंहासनावर फक्त ठाकरे आणि शिवसेना हेच नाव लिहिलेले आहे आणि असेल – डॉ. नीलम गोऱ्हे

 

Business Opportunity | मोदी सरकारच्या मदतीने लाखो कमावण्याची संधी, कसे उघडावे आपले जन औषधी केंद्र?

 

NCP Chief Sharad Pawar | मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शरद पवारांचा टोला