Devendra Fadnavis | ‘संजय पांडेंना ‘या’ बोलीवर मुंबई पोलीस आयुक्त केलं?’ – देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाईन टीम – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात पेन ड्राईव्ह सादर करत विधानसभा हलवून टाकली. फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इतके गंभीर आरोप केले आहेत की प्रत्येकाच्या मनात आता संशयाची सुई निर्माण झाली आहे. यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेले संजय पांडेंबाबतही (IPS Sanjay Pandey) खळबळजनक खुलासा केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी काही व्हिडीओ फुटेज सभागृहात सादर केले. यामधील एका क्लिपमध्ये संजय पांडे यांची मुंबई पोलीस (Mumbai Police Commissioner) आयुक्तपदी कोणत्या बोलीवर नियुक्ती करण्यात आली. फडणवीसांनी सादर केलेल्या क्लिपमध्ये, पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे निवृत्त होत आहेत. आता ते मुंबईचे सीपी (Mumbai CP) झाले असून त्यांनी केस रजिस्टर करून घेणार देतो असं सांगितलं आहे. त्याच बोलीवर आपण त्यांना बसवलं आहे. मी रजिस्टर (Register) करायला सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे. जयंत पाटील बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे (ED) तक्रार करा मग त्यांनी कारवाई केली नाही की दोन दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा मग आम्ही हायकोर्टात (Mumbai High Court) जाऊ, तोपर्यंत मेडिकलची फाईल सापडेल. भाजपला (BJP) 10 कोटी देणगी मिळाली याची तुम्ही तक्रार दाखल करा, या पत्रामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांची चौकशी स्टॉप होईल, असं क्लिपमधील संभाषण आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये (Video Clip) विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Special Public Prosecutor Pravin Chavan) यांच्या संभाषणाचे व्हिडीओ दाखवले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेते भाजपच्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीसांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळे (Sting operation) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President)
नाना पटोले (Nana Patole) यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. आमचे मित्र नटसम्राट आहेत,
स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis reveals sanjay pandey appointment mumbai cp in assembly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टवरील ‘पदसिद्ध’ नगरसेवकांचे संचालकपदही येणार संपुष्टात

 

Devendra Fadnavis | ‘अजित पवार सपोर्ट करत नाहीत, पण बडे साहब…’ देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात गौप्यस्फोट

 

Nandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली