Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis | 'देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं'; 'या'...

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक कारणावरुन आरोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते भाई जगताप (Congress leader Bhai Jagtap) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi government) कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं,’ असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

 

भाई जगताप म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल हे सर्व केल्याचा पश्चाताप फडणवीस (Devendra Fadnavis) यांना झालाय. फडणविसांच्या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या दावणीला बांधला. मुंबईसारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) खुश करण्यासाठी त्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्याचा पश्चाताप देडणवीसांना व्हायला हवा. असं ते म्हणाले.

पुढे बोलताना भाई जगताप म्हणाले, ‘राज्यात जेव्हा आघाडी सरकार होते.
तेव्हाही आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. यात नवीन काही नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा विषय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडतो.
मुंबईत एकटे लढण्याचा निर्णय हा स्थानिक नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे.
आमची ही भूमिका राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कळवलेली आहे.
आमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी बिघाडी होणार असे काही नाही,
असंही भाई जगताप (Congress leader Bhai Jagtap) म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis ruined 5 years not developed maharashtra said congress leader bhai jagtap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Pune News | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

Kalicharan Maharaj | ‘कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस’, कालीपूर कालीचरण महाराजांची मुक्ताफळे

Mahek Chahal-Riddhima Pandit | अखेर ‘नागिन 6’मध्ये महक चहल आणि रिध्दिमाची एन्ट्री; नागिन बनून करणार शत्रुंचा ‘नाश’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News