Devendra Fadnavis | ‘माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) उद्घाटनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. अशातच आता समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनावरून पुन्हा एकदा फडणवीस आणि ठाकरे- फडणवीस (Devendra Fadnavis) आमने सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

समृद्धी महामार्ग कोणीही कितीही प्रयत्न केला तरी माझा नाव त्यावरुन मिटवता येणार नाही आणि ते माझं श्रेय नाही, जनतेने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. ही संकल्पना 20 वर्ष माझ्या डोक्यात होती, की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही तो करू शकलो असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. नागपूरमध्ये (Nagpur) माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

 

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र ते काम पुर्ण न करता उद्घाटन झाल्यास महामार्गाचं महत्त्व कमी होईल,
असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर ते शेलू दरम्यानचा 220 किमीचा महामार्गाचा पहिला टप्पा आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मला एक गोष्टीचा आनंद आहे की त्यावेळी जे लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत होते.
मात्र आता ते देखील या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत फडणवीसांनी सरकारला टोला मारला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis said on samruddhi highway no one can erase my name thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

 

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

 

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !