Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा होती हे मान्य करा’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Devendra Fadnavis | दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. दोन वर्षे झाली तरी सारखं तेच मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आता मुखवटा काढा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.

फडणवीस म्हणाले, हे रोज म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्या दिवशी हे सरकार पडेल ते कळणार पण नाही. सध्या त्यात आम्हाला रस नाही.
कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा.
काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाही तर काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे.
एवढाच नाही तर शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेशी बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं गेलं आहे असेही त्यांनी या वेळी सांगितले.

 

किती वेळा म्हणणार…

दोन वर्षे झाली तरी सारखं तेच मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आता मुखवटा काढा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा. महत्त्वकांक्षा असणे राजकारणात चुकीचे नाही.
पण त्यामागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे.
जर तुम्हाला खरंच मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर तुमच्याकडे रावते, देसाईंसारखे शिवसैनिक होतेच. त्यांना मुख्यमंत्री करायचे.
का केले नाही तसे असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.
मुखमंत्री जर आपणाला बनायचं नव्हतं तर पक्षाच्या बाहेर राणेंना का जावं लागल? राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं.
त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे, असंही फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title : Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over chief minister position dasara melava

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न (व्हिडिओ)

Gold Silver Price | धनत्रयोदशीच्या 18 दिवस अगोदर किती झाला सोन्याचा दर, ऑक्टोबरमध्ये चांदीत 3600 रुपयांपेक्षा जास्त वाढ

Devendra Fadnavis | ‘सरकार ज्या दिवशी पडेल तेव्हा कळणारही नाही, पण..’, – देवेंद्र फडणवीस