Devendra Fadnavis | ‘शरद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात’; देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. आता या वादात भाजपने (BJP) उडी घेतलेली दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीचंनिमित्त साधत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलग 14 ट्विट केले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना कलम 370 (Section 370), हिंदू दहशतवाद (Hindu Terrorism), इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स (Kashmir Files), मुंबई बॉम्बस्फोट अनेक विषयांवरून लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट सोबत शरद पवारांची भूमिका व्यक्तव्य आणि त्यासंदर्भातील बातम्यांच्या लिंक देखील दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलच तापण्याची शक्यता आहे.

 

 

ज्यांचा जम्मू – काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 च्या समावेशाला विरोध होता.
मात्र, आता त्यांचे विचार आणि मूल्यांच्या विरोधात काय बोलले जात आहे, ते पाहा,
असं सांगत फडणवीस यांनी शरद पवार यांच्या भाष्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
अशाप्रकारची भूमिका ही समाजाच्या एकोप्यात बाधा आणणारी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात ही भूमिका कदापी स्वीकारली जाणार नाही, असंही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, फडणवीसांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला, याबद्दलच्याही लिंक पोस्ट केल्यात.
अल्पसंख्यांक समाज कोणाचाही पराभव करू शकतो या शरद पवारांच्या वक्तव्याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis takes a dig at ncp chief sharad pawar on babasaheb ambedkar jayanti

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा