Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) गुजरातकडे गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला (Maharashtra) का मिळाला नाही, यावरुन विरोधक राज्य सरकारला (State Government) धारेवर धरत असताना यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतेच स्पष्टीकरण दिले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर बोलताना मोठं विधान केले. महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षात गुजरातच्या (Gujarat) पुढे नेऊन दाखवेन, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (NCP Spokesperson Clyde Crasto) यांनी फडणवीसांना रोखठोक सवाल केला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुंबईत लघु उद्योग भरती प्रदेश अधिवेशनाचे (Small Business Recruitment Region Convention) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार टीका केली. मविआ सरकारने राज्याला गुजरातच्या मागे नेले. मात्र, आता आम्ही पुन्हा राज्याला नंबर एकवर नेऊ. अनेकदा गुजरातची चर्चा होते, अलीकडे तर जास्तच होते. आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. परंतु 2017 ला आपण पहिल्या क्रमांकावर होतो. दुर्दैवाने आपण दोन वर्षात मागे गेलो. आता जे बोलत आहेत त्यांनी गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेले, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) देखील फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आपल्याकडे रिफायनरी येणार होती.
त्यातून 3 लाख 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) होणार होती.
5 लाख रोजगार येणार होते. रिफायनरी तयार झाली असती तर राज्य 10 वर्षे पुढे गेले असते.
पण त्याला विरोध झाला. मोठी गुंतवणूक आपण घालवली. आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प आणणारच आहोत.
त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यात गुजरातपेक्षा पिछाडीवर असला तरी येत्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांना खोचक सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की ते महाराष्ट्र येत्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊन दाखवणार आहेत.
पण ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली आहे का? असा खोचक सवाल क्रास्टो यांनी ट्वीट करत केला.
तसेच पुढील दोन वर्षात केलेले विधान खरे ठरले नाही आणि महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणं शक्य झाले नाही तर देवेंद्र फडणवीस राजीनामा (Resignation) देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
याशिवाय ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहेत, तो पर्यंत हे शक्य होणार नाही, असे देखील क्रास्टो यांनी म्हटले.

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis will resign or not if his promise of maharashtra gujarat industrial race not fulfilled questions ncp clyde crasto