Devendra Fadnavis | फडणवीसांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका; म्हणाले, – ‘हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि आम्हाला सांगून राहीले…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Devendra Fadnavis | सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दिसत असतात. अनेक छोट्या मोठ्या कारणावरुन टीका-टिपणी होताना दिसते. ‘आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. अशी जोरदार टीका मागील काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपवर केली होती. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पलटवार केला आहे.

 

दिवाळी दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंकडून (Dhananjay Munde) स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलं होतं.
यात लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.
तेव्हा राज्यात विविध समस्या असतांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक भान विसरल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते अक्कलकोट (Akkalkot) येथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले.
त्यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि धनजंय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे.
2 वरुन 302 वर गेलेली हा पार्टी आहे. 4-6 खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये.
आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. असं फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत.
हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे.
अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतो, हा प्रयत्न तुम्ही करा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnvis criticized minister and ncp leader dhanajay munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ST Workers Agitation | भाजपनेच ST कर्मचाऱ्यांना भडकवले, अनिल परबांचा थेट आरोप; दिला ‘हा’ इशारा

Parliament Winter Session 2021 | यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, जाणून घ्या Date

Maharashtra Police | दुर्देवी | चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू