Devendra Fadnavis | ‘नाना पटोलेंना असे झटके येत असतात, त्यामुळे ते…’, मोदींवरच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. तर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदी ओबीसी (OBC) नाही, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हणत टीका केली आहे. काँग्रेसच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, देशभरात सध्या काँग्रेसचं कुठेच अस्तित्व राहिलेले नाही. या पक्षाचा आवाज ना संसदेत (Parliament) आहे, ना रस्त्यावर ना लोकांमध्ये. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नकारात्मकता आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही काम करत असतील तर त्यावर नुसती टीका आणि विरोध करणे हा काँग्रेसचा ठरलेला कार्यक्रम झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

तर जलयुक्त शिवाराची चौकशी बंद…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकजण त्यांना काहीही माहिती नसताना बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही अशा विरोधकांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. पत्रकारांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) सुरु केलेल्या जलयुक्त शिवार चौकशी प्रकरणी (Jalyukta Shivar Inquiry Case) प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जिथे गडबड आहे किंवा ज्याठिकाणी अनियमितता दिसतेय अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही आणि जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या चौकशी लावली आहे अशा चौकशी बंद केल्या जातील.

 

पटोलेंना झटके येत असतात…
नाना पटोलेंना वारंवार झटके येत असतात, त्यामुळे काहीही बोलत असतात, असा पलटवार फडणवीस यांनी पटोले यांच्यावर केला.
नांदेडमध्ये कुठेही धक्काबुक्की झालेली नाही किंवा कुठेही लाठीचार्ज झाला नाही.
विद्यार्थी पोलीस भरतीची (Police Recruitment) मागणी करत होते. त्यावेळी मी जाऊन त्यांना भेटलो.
लवकरच पोलीस भरती करणार असल्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader fadnavis responded to congress criticism of pm modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)